Belagavi

माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन

Share

देशाच्या स्वातंत्र्योत्तर विकासात सलग चार दशके अमूल्य योगदान देऊन प्रगतीचे अनेक प्रकल्प राबवणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद हे महान नेते होते, असे गौरवोद्गार युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी यांनी काढले.

बेळगाव शहरातील बी. शंकरानंद मार्गावरील स्मारक परिसरात आयोजित जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुमारे ४० वर्षे सक्रिय राजकारणात राहून देशाच्या प्रगतीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना शंकरानंद यांचे सुपुत्र प्रदीप शंकरानंद कणगलि यांनी, आपल्या वडिलांनी गरिबांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी संपूर्ण जीवन समर्पित केल्याचे सांगितले. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत शंकरांद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास बीडीसीसी बँक संचालक राहुल जारकीहोळी, प्रदीप शंकरांद, मल्लेगौडा पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, डीसीपी एन. व्ही. बरमणी, एसीपी संतोष सत्यनायक, एसीपी शेखरप्पा एच., माजी पीडब्ल्यूडी अधिकारी रमेश दामण्णावर, जागृती बँक अध्यक्ष अमाती तळवार, मल्लेष चौगुले, मिलिंद वराळे, रवींद्र केळगडे यांच्यासह बी. शंकरांद यांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags: