बेळगाव तालुक्यातील मोदगा येथे १ कोटी रुपये खर्चाच्या श्री सिद्धेश्वर समुदाय भवनाचे लोकार्पण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडले.

गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांच्या विविध कार्यक्रमांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, निवडणुकीपुरते न येता वर्षभर ३६५ दिवस लोकांच्या सोबत राहून काम करत असल्याचे सांगितले. मोदगा येथील हनुमान मंदिराची ९३ एकर जमीन सोडवून घेतली असून, यावर खोटी टीका करणाऱ्यांनी देवापुढे येऊन शपथ घ्यावी असे आव्हान त्यांनी दिले.


यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी, जात-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments