सवदत्ती तालुक्यातील हर्षा शुगर्स कारखान्याच्या २०२६-२७ या वर्षातील गळीत हंगामाचा आणि बॉयलर पूजनाचा शुभारंभ सोमवारी धार्मिक विधीनुसार पार पडला.

हुली सांबय्यानवर मठाचे पूज्य श्री उमेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते बॉयलर पूजन करून गळीत हंगामाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी मागील हंगामात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी आणि कारखाना यांच्यातील नाते दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.


या प्रसंगी कारखान्याच्या अध्यक्षा तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, गिरिजा हट्टीहोळी यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि बैलहोंगल, सवदत्ती, कित्तूर व धारवाड परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments