hubali

गांजा विक्री प्रकरणी दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास

Share

गांजाची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री प्रकरणात दोषी ठरलेल्या दोघांना धारवाड जिल्हा न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

९ एप्रिल २०२३ रोजी जुने हुब्बळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवार रोडवर रिक्षातून गांजाची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून बसवराज भजंत्री आणि शिवराज गजकोश यांना अटक करून १,१५४ ग्राम गांजा जप्त केला होता.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रुद्रप्पा गुडादरी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने बसवराज भजंत्री आणि शिवराज गजकोश यांना शिक्षेचा हुकूम दिला.

Tags: