State

कलबुर्गी येथे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून एकाला अटक; गृहमंत्री प्रियंक खरगे यांची माहिती

Share

कलबुर्गी येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय तरुणाला संयुक्त कारवाईत अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री प्रियंक खरगे यांनी दिली.

कलबुर्गीच्या सराफ बाजारातील दागिने बनवण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या मुश्ताक-उल-मलिक (मूळ रा. पश्चिम बंगाल) या संशयिताला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात होता व गोपनीय माहिती इतरत्र देत होता.

या घटनेवर बोलताना गृहमंत्री प्रियंक खरगे म्हणाले की, परराज्यातून कामासाठी येणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करूनही व्यावसायिक योग्य ती माहिती देत नाहीत. या पार्श्वभूमीवर सण-उत्सवानंतर व्यावसायिक, होमस्टे चालक व आस्थापना मालकांची बैठक घेऊन कडक नियमावली लागू केली जाईल.

Tags: