Dharwad

पश्चिम पदवीधर मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण; डॉ. आर. एम. कुबेरप्पा यांचा अर्ज

Share

पश्चिम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसला बंडखोरीचा मोठा फटका बसला असून डॉ. आर. एम. कुबेरप्पा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसकडून मोहन लिंबिकाई यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या डॉ. कुबेरप्पा यांनी आपल्या समर्थकांसह धारवाड मुख्य पोस्ट ऑफिस मार्गाने येत अर्ज सादर केला.

कुबेरप्पा यांच्या या बंडखोरीमुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहन लिंबिकाई यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे एस. व्ही. संकनुर आणि काँग्रेसचे बंडखोर डॉ. कुबेरप्पा यांनी अर्ज दाखल केल्याने पश्चिम पदवीधर मतदारसंघातील लढत रंजक बनली आहे.

Tags: