इदलहोंड खानापूर येथील सर्प मित्र म्हणून गेल्या दहा वर्षापासुन साप पकडण्याचे काम करत असले युवक बडकू( सातोरी) विठ्ठल सुतार (वय.३८) याचे मंगळवारी दि.,६ रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला.
बडकू हा नेहमी प्रमाणे सापला पकडुन जंगलात सोडायला गेला होता.सापाला सोडतानाच सापाने त्याच्या हाताला दंश केले.त्यातच त्याचा मृत्यू झाला.

बडकू सुतार हा इदलहोंड परिसरात गेल्या दहा वर्षापासुन साप पकडुन तो जंगलात सोडण्याचे काम करत असे.अशाच प्रकारे मंगळवारी सुध्दा एका ठिकाणी साप पकडला होता.तो साप जंगलात सोडण्यासाठी गेला.जंगलात गेल्यानंतर सापाला सोडण्यासाठी पोत्याचे तोंड उघडले असता सापानेच पल टी मारून त्याच्या हाताला दंश केले.सर्पदंश होताच ते जागीच कोसळले.नेमके याचवेळी कोणी सोबत नव्हते.नेहमी साप जंगलात सोडताना मित्राना सोबत घेऊन जातअसे
यावेळी एकटाच जंगलात साप सोडायला गेला होता.

परंतु बराच वेळ झाला तरी आला नाही, म्हणून कुटूंबानी व ग्रामस्थानी शोध घेतला.असता जंगलात बेशुध्द अवस्था सापडला.घटनेची माहिती मिळताच मा जी आमदार दिगंबर पाटील याचे चिरंजीव यशवंत दिगंबर पाटील यानी लागलीच गणेबैल टोलनाक्याजवळील रूग्ण वाहिका मागवुन उपचारासाठी बेळगावला दाखल केले मात्र डाॅक्टरानी मृत घोषित केले.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगीअसा परिवार आहे.आर्थिक परिस्थिति गरीबी ची असल्याने त्याच्या कुटूंबार दु:खाता डोंगर कोसळला आहे.
खानापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.त्याच्या मृत्यूने इदलहोंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments