Hukkeri

११ ऑक्टोबरपासून हुक्केरी दसरा उत्सवाला सुरुवात

Share

येत्या ११ ऑक्टोबरपासून हुक्केरी दसरा उत्सवाला सुरुवात होणार असल्याची माहिती हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामीजी यांनी दिली.

दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी बैठकीत एच. एल. पूजार, गुरु कुलकर्णी, सुरेश जिनराळे आणि सी. एम. दरबारे यांनी उत्सवाचे नियोजन आणि जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

त्यानंतर बोलताना चंद्रशेखर महास्वामीजी यांनी, म्हैसूर येथील पंडितांच्या पौरोहित्याखाली दररोज चंडिका होम आणि संध्याकाळी गुड्डापूर दानम्मा देवीवर प्रवचन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी पिंटू शेट्टी, चन्नप्पा गजबर, आनंद पट्टणशेट्टी, रवी पट्टणशेट्टी, श्रीशैल संबाळ, बाबूराव मुन्नोळी, सुभाष नाईक, महांतेश संबाळ, श्रीशैल हुंडेकार यांच्यासह मठाचे मानकरी उपस्थित होते.

बैठकीनंतर दसरा उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.
* राजू बागलकोटी (इन न्यूज, हुक्केरी)

Tags: