टायर अचानक फुटल्याने दुधाचे पदार्थ घेऊन जाणारा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील ऊसाच्या शेतात उलटल्याची घटना चिकोडी-अंकली रस्त्यावरील अंकलीजवळ घडली.

या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने चिकोडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘दालशिया’ कंपनीचे दुधाचे पॅकेट्स व इतर दुग्धजन्य पदार्थ घेऊन टेम्पो हमीदवाडा येथून अंकलीकडे जात असताना पुढचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. अपघातात टेम्पोतील दूध आणि दह्याचे पॅकेट्स सांडून नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन उर्वरित माल बाजूला केला आणि क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाजूला घेण्यात आला.
या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Recent Comments