राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते होत असल्याबद्दल हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी मतदारसंघातील विविध भागांत राज्य सरकारच्या विकासकामांचे उद्घाटन करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्य सरकारच्या विकासकामांचे श्रेय आपल्या कन्या व खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या नावे करत असून, त्यामुळे स्थानिक आमदारांना उद्घाटनाची संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकारच्या विकासकामांचा प्रारंभ त्या-त्या भागातील स्थानिक आमदारांच्याच हस्ते झाला पाहिजे. खासदारांनी केंद्राकडून निधी आणून उद्घाटन केल्यास आमची हरकत नाही, असेही निखिल कत्ती यांनी स्पष्ट केले.


Recent Comments