Vijayapura

कसाप अध्यक्षपदासाठी जाणगेरे व्यंकटरामाय्या यांना ज्येष्ठ साहित्यिकांचा पाठिंबा

Share

कन्नड साहित्य परिषदेच्या (कसाप) निवडणुकीची रंगत विजापुरात वाढत असून अध्यक्षपदाचे उमेदवार जाणगेरे व्यंकटरामाय्या यांच्या पाठीशी ज्येष्ठ साहित्यिक आणि कन्नड विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष उभे राहिले आहेत.

विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक नागतिहल्ली नागराज आणि कन्नड विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रा. एस. जी. सिद्धरामय्या यांनी व्यंकटरामाय्या यांना जाहीर पाठिंबा दिला.

साहित्य परिषदेच्या कारभारात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नसावा, असे सांगत प्रा. सिद्धरामय्या यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय दबावामुळे परिषदेच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचल्याचा आरोप केला.

कन्नड शब्दकोश प्रकल्प पुन्हा सुरू करणे, ‘कन्नड नुडी’ हे मुखपत्र पुन्हा प्रकाशित करणे आणि पुस्तक जत्रा आयोजित करणे या संकल्पनेसह आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे उमेदवार जाणगेरे व्यंकटरामाय्या यांनी सांगितले.

कन्नड साहित्य परिषद ही भाषा आणि संस्कृतीची प्रतिनिधी संस्था असून तिची स्वायत्तता आणि मूळ उद्देश टिकवून ठेवणे काळाची गरज असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Tags: