चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा मधील एका ६५ वर्षीय महिलेच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात तिच्या ७२ वर्षीय पतीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

एकसंबा येथील रहिवासी सुशीला सुभाष सातवर आणि सुभाष सिदलिंग सातवर अशी मरणानंतरही एकत्र राहिलेल्या या दुर्दैवी दांपत्याची नावे आहेत.

रक्तदाब कमी झाल्याने सुशीला यांच्यावर चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर आजारी असलेले पती सुभाष यांनाही गुरुवारी त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र गुरुवारी रात्री ८ वाजता उपचारादरम्यान सुशीला यांची प्राणज्योत मालवली. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच धक्का सहन न झाल्याने सुभाष सातवर यांनीही रात्री ९.३० वाजता अंतिम श्वास घेतला.


Recent Comments