Raibag

रायबाग : शेतात आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील माडलगी गावात एका ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.

कल्लव्वा सदाशिव मराडी असे मृत महिलेचे नाव आहे. ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महिलेचा मृत्यू हत्येतून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरी, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

हा प्रकार घातपाताचा आहे की इतर काही कारणाने मृत्यू झाला आहे, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेची सविस्तर माहिती समोर येणार आहे.

Tags: