Chikkodi

निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्यावर लोकायुक्तांची धाड

Share

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निवासावर आणि कार्यालयावर बुधवारी पहाटेच धाड टाकली.

बेळगाव लोकायुक्त एसपी प्रसन्न देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निपाणी, अथणी आणि मूडलगी येथे एकाच वेळी ही व्यापक शोधमोहीम राबवली.

नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, बँक पासबुक तसेच रोकड आणि दागिन्यांची माहिती ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

सध्या बेळगाव लोकायुक्त एसपी प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेल्या मालमत्तेचे अधिकृत मूल्य आणि सविस्तर माहिती समोर येणार आहे.

Tags: