धारवाड शहराच्या वेशीवर असलेल्या सिंगनहळ्ळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर लॉरी आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

सिंगनहळ्ळी गावाजवळील एका कंपनीतून लॉरी बायपास रस्त्यावर येत असताना ही घटना घडली. लॉरी उजव्या बाजूला वळत असताना अचानक दुचाकीची धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात ने जात असताना वाटेतच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसआय प्रवीण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, गरग पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.



Recent Comments