Bagalkot

जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादात ढाबा मालकाचा मृत्यू; पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा आरोप

Share

जेवणाच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ढाबा मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बागलकोटमधील गद्दनकेरी क्रॉस येथे घडली आहे.

गद्दनकेरी क्रॉस येथील ढाबा मालक मेहबूबसाब पट्टेवाले (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा कारागृहात हवालदार म्हणून कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अडिवेप्पा रबकवी याच्यावर या मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.

१७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण संपल्याचे सांगितल्यावरून झालेल्या वादात अडिवेप्पा याने मेहबूबसाब यांच्या डोक्यावर गंभीर मारहाण केली होती.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला केला असून याप्रकरणी कलादगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: