Dharwad

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे हाल; रीलद्वारे मांडली रस्त्याची व्यथा!!

Share

धारवाड तालुक्यातील हारोबेळवडी येथील प्रमोद या विद्यार्थ्याने रीलच्या माध्यमातून गावातील रस्त्याची भीषण दुरवस्था समोर आणली असून, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हारोबेळवडी ते आयाट्टी या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनला आहे.

रस्त्याची ही भीषण अवस्था दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत धोकादायक ठरत असून दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत.

लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर या व्हिडिओमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Tags: