काम न करताच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी लाटणाऱ्या उगार खुर्द नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

२०२२ मध्ये कचरा व्यवस्थापन (SWM) प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे कंत्राट काढून, काम पूर्ण झाल्याचे खोटे अहवाल तयार करून अधिकाऱ्यांनी परस्पर पैसे लाटले होते.

उपलोकायुक्त चिकोडी दौऱ्यावर येत असल्याचे समजताच, सामाजिक कार्यकर्त्यांनी हा सर्व घोटाळा थेट त्यांच्यासमोर मांडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
लोकायुक्तांच्या कारवाईच्या भीतीने हादरलेल्या अधिकाऱ्यांनी आज घाईघाईने संबंधित ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची धावपळ केली.
अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद कृतीमुळे त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


Recent Comments