उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी गुरुवारी चिकोडी येथील महिला व बाल रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील कारभाराची झाडाझडती घेतली.

रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटाची पाहणी केली असता, वेळेवर न येणे आणि आधीच स्वाक्षऱ्या करून अनुपस्थित राहणे असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

औषध गोडाऊन, प्रसूती विभाग आणि शस्त्रक्रिया गृहाची पाहणी करून स्वच्छता व सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना खडसावून योग्य सूचना दिल्या.

गरोदर महिलांची रुग्णालयात रीतसर नोंद न ठेवणे आणि त्यांना सोनोग्राफी व तपासणीसाठी खाजगी केंद्रात पाठवण्याच्या प्रकारावर त्यांनी चिंता व्यक्त करत आरोग्य अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले.

यावेळी जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. शशिकुमार, लोकायुक्त एसपी प्रसन्न देसाई यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




Recent Comments