Belagavi

मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप चुकीचा; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा निर्वाळा

Share

बेळगाव येथील वीरभद्र नगर उर्दू शाळा मतदान केंद्रावर अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली जात असल्याचा आरोप जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी फेटाळून लावला आहे.

सध्याच्या टप्प्यात एकाही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात आलेले नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मोठ्या प्रमाणावर (बल्क) प्राप्त झालेल्या ‘फॉर्म ७’ अर्जांबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, पुराव्यांशिवाय आलेले आक्षेप थेट स्वीकारले जाणार नाहीत.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ५ पेक्षा जास्त नावांवर आक्षेप घेणाऱ्या अर्जांची प्राथमिक चौकशी अधिकाऱ्यांमार्फत (ERO) केली जाणार आहे.

या प्रकरणी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली असून, खोटे आक्षेप नोंदवणाऱ्यांवर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ३१ अन्वये कडक कारवाई केली जाईल.

Tags: