Dharwad

धारवाड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

Share

मान्सूनच्या पावसाने दगा दिल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देत राज्य सरकारने अखेर धारवाड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. पहिल्या यादीतून नाव वगळल्यानंतर झालेल्या विरोधानंतर शासनाने दुसरी यादी जाहीर करत हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या १०१ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत धारवाड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि कन्नड संघटनांनी तीव्र असंतोष व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले होते.

आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत धारवाड, नवलगुंद, अण्णिगेरी तसेच हुबळी शहर आणि हुबळी ग्रामीण या तालुक्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Tags: