धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेले चार मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांनी ते मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत.


मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष शोधमोहीम राबवण्यात आली होती. ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या वापराद्वारे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी या चारही मोबाईलचा शोध घेतला.

शोध घेण्यात आलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सोपवण्यात आले असून, हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. विद्यागिरी पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.


Recent Comments