धारवाडच्या जनतानगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन एक जण भाजल्याने गंभीर जखमी झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.


राजेसाब असे जखमीचे नाव आहे. स्फोटानंतर घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे पाहून स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राजेसाब यांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या गंभीर जखमा असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्फोटामुळे घरातील साहित्य तसेच भिंतींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटना विद्यागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.


Recent Comments