खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी हैदराबाद येथे आयोजित भारत समिटमध्ये सहभाग घेतला.

तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू आणि परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांची भेट घेऊन त्यांनी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. गोवा राज्याच्या काँग्रेस प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती तसेच युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा केली.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, सुप्रिया भारद्वाज आणि उषा नायडू यांच्याशी संवाद साधून त्यांनी आवश्यक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी डॉ. अंजली निंबाळकर सक्रियपणे कार्यरत आहेत.


Recent Comments