Belagavi

डॉ. प्रभाकर कोरे यांचा पुण्यात विशेष नागरी सत्कार

Share

के. एल. ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे यांना भारत सरकारकडून ‘पद्वश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि ह.भ.प. सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण लिंगायत समाजाच्या वतीने डॉ. कोरे यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: