चिक्कोडी :तालुक्यातील नणदी शर्यतीच्या मैदानाजवळ पार्क केलेल्या एका दुचाकीची दोन्ही चाके चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

मलिकवाड येथील रहिवाशाची ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ (KA 23 H 3858) ही दुचाकी मैदानाजवळ उभी होती. अज्ञात चोरांनी संधी साधत या बाईकची दोन्ही चाके काढून पळ काढला.

सदर घटना सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकारामुळे स्थानिक वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Recent Comments