Dharwad

भूषण बोरसे यांनी स्वीकारला हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार

Share

हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तपदी कोण येणार यावरून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या गोंधळाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी भूषण बोरसे यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदभाराची सूत्रे स्वीकारली.

राज्य सरकारने नुकतीच हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांची बदली करून त्यांच्या जागी बेळगावचे आयुक्त भूषण बोरसे यांची नियुक्ती केली होती. मात्र बोरसे यांना बेळगावातून सोडण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने शशिकुमारच काही काळ पदावर कायम राहिले होते.

भूषण बोरसे हुबळी-धारवाडला रुजू होणार नाहीत अशा विविध चर्चा आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र या सर्व अफवांना पूर्णविराम देत बोरसे यांनी आज जुळ्या शहराच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

Tags: