hubali

हुबळीत कार आणि बाईकच्या अपघातात महिलेचा मृत्यू

Share

हुबळीतील सप्तगिरी नगर येथील जे. के. शाळेजवळ कार आणि बाईक यांच्यात अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूपा सोळंकी यांना तत्काळ किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कार आणि बाईकच्या या अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या प्रकरणी हुबळी उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: