हुबळीतील आसरा गल्लीत हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.


हिंदू संघटनांनी आयोजित केलेले आंदोलन आणि मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. पहाटेपासूनच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा व्यवस्था हाताळत आहेत.

आसरा गल्ली आणि आसपासच्या परिसरात पोलिसांची कडक नजर असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Recent Comments