hubali

माजी नगरसेवकाकडून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण!

Share

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून माजी नगरसेवक लक्ष्मण गंडगाळेकर यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना हुबळी येथे घडली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हुबळीतील तोरवी हक्कला येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून वाद झाला. या वेळी शब्दाने शब्द वाढल्याने माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या वादाचे नेमके कारण काय होते, हे आता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags: