बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात योग्य बस सोय नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमन्नावर यांना निवेदन दिले.

मच्छे गावाची लोकसंख्या सुमारे १५ ते २० हजार असून रोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व कामगार शहरात ये-जा करतात. या मार्गावरून धावणाऱ्या बसेस मच्छे गावात थांबवल्या जात नसल्याने नागरिकांना ऑटो किंवा टेम्पोने प्रवास करावा लागत आहे. अलिकडेच बस पकडताना एक विद्यार्थिनी पडून जखमी झाल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला.

या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थिनींनी उपाध्यक्षांची भेट घेऊन अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणी केली. सोमवारपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन उपाध्यक्षांनी दिले असून, प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Recent Comments