बेळगावातील सिव्हिल रुग्णालयात १५ दिवसांपासून ठेवलेल्या एका बेवारस मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांनी सन्मानाने अंत्यसंस्कार केले.

‘बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीम’च्या कार्यकर्त्यांनी खडेबाजार पोलीस आणि बेळगाव महापालिकेच्या सहकार्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या.

टीमच्या सदस्यांनी खडेबाजार पोलिसांच्या उपस्थितीत हिंदवाडी स्मशानभूमीत हा अंत्यसंस्कार सोहळा पार पाडला.
या निस्वार्थ सेवेमुळे एका अज्ञात व्यक्तीला शेवटचा निरोप देणे शक्य झाले. या उपक्रमाचे शहरवासीयांतून कौतुक होत आहे.


Recent Comments