रौयबाग तालुक्यातील कुडची येथील इंदिरा कॅन्टीनमध्ये नागरिकांसाठी जेवण बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


कॅन्टीनचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, नगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या आवश्यक अस्वयंपाक सुविधा आणि साहित्य अद्याप पूर्ण मिळालेले नाही. दोन वेट ग्राइंडरऐवजी केवळ एकच पुरवण्यात आले असून, याबाबत अनेकदा मागणी करूनही नगरपालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे कंत्राटदाराने स्पष्ट केले.

शासनाकडून कॅन्टीनच्या देखभालीसाठी मोठा निधी खर्च केला जात असतानाही नागरिकांना दर्जाहीन अन्न पुरवले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सुरुवातीच्या दिवसांत मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा आता राहिलेला नाही, असा आरोपही केला जात असून, याप्रकरणी नगरपालिका मुख्याधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments