बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग शहरातील आदर्श बारजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत व्यक्तीचे नाव आणि पत्ता शोधण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती गोळा केली, मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रायबाग सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन रायबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.


Recent Comments