Belagavi

श्री शांतिसागर संस्कार बंधन शिबिराचा बेळगावात उत्साहात प्रारंभ

Share

जैन युवा संघटनेतर्फे आयोजित ‘श्री शांतिसागर संस्कार बंधन शिबिरा’चा आज बेळगाव शहरात उत्साहात प्रारंभ झाला. या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पारंपरिक वेषाभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रावक आणि श्राविकांनी या मिरवणुकीची शोभा वाढवली. माजी आमदार संजय पाटील, विनोद दोडण्णावर, रतन रामगोंडा, सुनील चौगुले, गोटडकी, राजू जक्कण्णावर यांच्यासह जैन समाजातील विविध संस्था, महिला मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या दिवशीच्या यशस्वी सोहळ्यानंतर, उद्या हे शिबीर धामणे गावात संपन्न होणार आहे.

Tags: