माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल रायबागचे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऐहोळे यांनी बेळगाव जिल्ह्याला अधिक प्रतिनिधित्वाची गरज असल्याचे सांगितले. जिल्ह्याला किमान तीन मंत्रिपदे मिळणे अपेक्षित होते, तरीही दोन मंत्रिपदे मिळाल्याचा आनंद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघाच्या विकासात कोणताही राजकीय भेदभाव केला जाणार नाही, असे सांगत रायबाग परिसराच्या विकासासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिले.


Recent Comments