Khanapur

शॉर्ट सर्किटमुळे हिरेमुनवळी ग्रामपंचायत कार्यालय खाक

Share

खानापूर तालुक्यातील हिरेमुनवळी ग्रामपंचायत कार्यालयाला काल रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रात्री आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, तरीही कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज, संगणक व फर्निचर जळून नष्ट झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आगीच्या कारणाची चौकशी सुरू आहे.

Tags: