Belagavi

मुतग्याची विद्यार्थिनी सृष्टी आपटेकरची एमबीबीएससाठी निवड

Share

द्वितीय पीयूसी विज्ञान शाखेत ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या मुतगा येथील सृष्टी आपटेकर हिने बागलकोट येथे एमबीबीएसची जागा पटकावली. या यशाबद्दल महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सृष्टीला लॅपटॉप व आर्थिक मदत देऊ केली.

दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीताई फाउंडेशनतर्फे सृष्टीचा सत्कार करण्यात आला होता. आता वैद्यकीय शिक्षणाच्या तिच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी ही मदत करण्यात आली. या वेळी आणखी एक उगवती प्रतिभा रंजना जगदीश कौजलगी हिच्या शैक्षणिक यशाची दखल घेत तिलाही पुढील अभ्यासासाठी लॅपटॉप प्रदान करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणे ही समाजाची जबाबदारी असून, योग्य वेळी मिळालेली मदत विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यास मदत करते, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Tags: