हुबळी-धारवाड या जुळ्या शहरांतील प्रवाशांच्या जलद प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या बीआरटीएस ‘चिगरी’ बस सेवेचा खोळंबा सातत्याने सुरूच आहे. यापूर्वी अपघातांमुळे चर्चेत आलेली चिगरी बस आता कुठेही अचानक बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

रविवार रात्री उशिरा धारवाडमधील जुबली वर्तुळातच एक चिगरी बस अचानक बंद पडली, ज्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. जुबली वर्तुळातील चिगरी बस स्थानकातच बस बंद पडल्याने मागून येणाऱ्या इतर बसेसच्या वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. यामुळे बसमधील प्रवाशांसह हुबळीकडे जाण्यासाठी स्थानकात ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

अलीकडच्या काळात चिगरी बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असून बसेस सतत रस्त्यातच बंद पडत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षाविरोधात सरकारने त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जुळ्या शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.


Recent Comments