धारवाड शहर पोलिसांनी कारवाई करत घर, मंदिर आणि दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली आहे. संशयिताकडून ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचे दागिने आणि वाहनासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हुबळी येथील टिंबर यार्ड भागातील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या धारवाड येथील गांधी चौक परिसरातील बस्ती गल्लीत राहणारा असिफ कासीमसाब बेग याला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.

संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने दोन घरे, एक मंदिर आणि एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या चौकशीतून चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस कारवाईत आरोपीकडून ४२ ग्रॅम सोने, २० ग्रॅम चांदी आणि एक दुचाकी असा एकूण ५ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आरोपीची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


Recent Comments