धारवाड जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. नुकतीच मंत्री म्हणून शपथ घेतलेले संतोष लाड यांनी धारवाड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा केला.


धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हारोबेळवडी गावाला भेट देऊन मंत्री संतोष लाड यांनी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पीक नुकसानीचा आढावा घेतला.


या वेळी मंत्री संतोष लाड यांच्यासोबत आमदार एन. एच. कोनरेड्डी, जिल्हाधिकारी स्नेहल आर. आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भुवनेश्वर कुमार उपस्थित होते.


Recent Comments