धारवाड तालुक्यातील कब्बेनूर गावात पावसाने दांडी मारल्याने मूग पीक वाळून गेले आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने पिकात शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या.

कब्बेनूर येथील शेतकरी ईरण्णा करडीगुड्डा यांनी चांगल्या पावसाच्या आशेने कर्ज काढून १६ एकर शेतात मुगाची पेरणी केली होती. मात्र, योग्य वेळी पाऊस न पडल्याने पीक पूर्णपणे करपून गेले.

पीक वाया गेल्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने मुक्या जनावरांची तरी भूक भागावी या उद्देशाने शेतात शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.
धारवाडसह अनेक जिल्ह्यांत पाऊस झालेला नाही, तरीही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन परिस्थितीची पाहणी करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
शासनाने तात्काळ पावसाचा फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments