Dharwad

धारवाडमध्ये औषधवाहू टेम्पोला लॉरीची धडक

Share

धारवाड येथील कोर्ट चौकात गुरुवारी उशिरा रात्री औषधवाहू मिनी टेम्पोला लॉरीने जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो दोन वाहनांच्या मध्ये अडकल्याने काही जण जखमी झाले असून रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

धारवाड हॉटेलसमोर औषधवाहू टेम्पोला लॉरीने धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे टेम्पो दोन वाहनांच्या मध्ये चिरडला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांची मोठी कसरत झाली.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी धारवाड वाहतूक पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Tags: