उद्या होणाऱ्या नागरी पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर धारवाडमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.


रविवारी सकाळी पुरुष उमेदवारांची, तर दुपारी महिला उमेदवारांची लेखी परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्रांच्या परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्नेहल आर., पोलीस आयुक्त एन. शशिकुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी परीक्षा केंद्रांसह स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे आणि ग्रंथालयांना भेट देऊन तयारीची पाहणी केली.

यावेळी परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स केंद्रांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.


Recent Comments