Dharwad

धारवाडमध्ये विनय कुलकर्णी समर्थकांचा विजयोत्सव

Share

काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे धारवाडमध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठा विजयोत्सव साजरा केला.

भाजप नेते योगेशगौडा हत्या प्रकरणात लोकप्रतिनिधी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले विनय कुलकर्णी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर धारवाड येथील हेब्बळ्ळी अगसी परिसरात विनय कुलकर्णी यांचे समर्थक, महापालिका सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली.

विनय कुलकर्णी यांच्या नावाने घोषणाबाजी करत एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. जामिनासोबतच विनय कुलकर्णी यांना धारवाड शहरात प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्याने समर्थकांमधील उत्साहाला उधाण आले आहे.

Tags: