State

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार: लक्ष्मण सवदींना संधी, हेब्बाळकरांची निराशा!

Share

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या उत्सुकतेवर अखेर पडदा पडला असून बेळगाव जिल्ह्यातून अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातून अनेक आमदार शर्यतीत असताना हायकमांडने लक्ष्मण सवदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून लक्ष्मी हेब्बाळकर आणि अशोक पट्टण यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

या नव्या मंत्रिमंडळात लक्ष्मण सवदी, चेलुवरायास्वामी, एच. सी. बालकृष्ण, जमीर अहमद खान, गायत्री शांतेगौडा, मधू बंगारप्पा, अजय सिंह, शिवराज संगडगी, रुद्रप्पा लमाणी, रघूमुर्ती, रिझवान अर्शद, शिवलिंगेगौडा, पुट्टरंगशेट्टी, संतोष लाड, नरेंद्रस्वामी, मंकाळ वैद्य, विजयानंद काशप्पनवर, बी. नागेंद्र, बसवराज रायरेड्डी आणि के. एस. बसवंतप्पा यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणुका, प्रादेशिक व जातीय समतोल साधत काँग्रेस हायकमांडने अनुभवी व नवीन चेहऱ्यांचा मेळ घालत ही यादी अंतिम केली आहे.

आज संध्याकाळी बंगळुरू येथील राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून अथणी तालुक्यात सवदी यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Tags: