State

आम. लक्ष्मण सवदिंना मंत्रिमंडळ प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन!

Share

राज्य राजकारणात मोठी घडामोड घडली असून, नवीन मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडून फोन आल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे.

आज संध्याकाळीच शपथविधी सोहळा पार पडणार असून, लक्ष्मण सवदी यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे बेळगावच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना सरकारकडून महत्त्वाचा फोन आला.

माध्यमांशी बोलताना लक्ष्मण सवदी यांनी सांगितले की, नवीन मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी फोन करून आज संध्याकाळच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ज्येष्ठ नेते असलेल्या लक्ष्मण सवदी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Tags: