जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात मानवी तस्करी प्रतिबंध दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.

बेळगावातील नेहरूनगर येथील श्री महेश्वरी अंध मुलांच्या शाळेत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार आणि बाल शोषण रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून अक्का पथक तसेच ११२ सारख्या आपत्कालीन हेल्पलाइन प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मानवी तस्करी रोखण्यासाठी सरकारी विभागांसह नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक एम. एन. चेतन कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments