बेळगावात आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ‘शीख आणि हिंदू धर्माचा तुलनात्मक आढावा’ विषयावर प्रवचन कार्यक्रम


हिंडलगा येथील एसीपीआर गुरुदेव रानडे मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे विशेष प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे आंतरराष्ट्रीय वक्ते सुजी भय्या उर्फ सुखविंदरसिंग छाब्रा यांनी ‘शीख आणि हिंदू धर्माचा तुलनात्मक आढावा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.


“स्वतःच्या मूळ धर्माची ओळख नसलेली व्यक्ती मुळांशिवायच्या वृक्षाप्रमाणे असते,” असे सांगत त्यांनी विद्यार्थी व नागरिकांना आपल्या धर्माची आणि संस्कृतीची माहिती करून घेण्याचे आवाहन केले. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रवचनात त्यांनी विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक हर्षद पत्रावळी, आरती आपटे, स्वाती जोग, सुहास जोशी तसेच अभियंता भीमसेन कुरली यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments