स्टेअरिंगमध्ये अचानक बिघाड झाल्याने गॅसने भरलेला टँकर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडल्याची घटना आज धारवाड येथील साई अरण्य हॉटेलसमोरील महामार्गावर घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

व्हॉईस ओव्हर – बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात असलेल्या गॅस टँकरचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन रस्त्याच्या मध्यभागीच थांबला. टँकरमध्ये गॅस असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात आली. मात्र, सुदैवाने टँकर पलटी न झाल्याने मोठा अपघात टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबवून टँकर सुरक्षितपणे हटविण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.



Recent Comments